Bhosari Crime News : वकील असल्याची बतावणी करून दस्त नोंदणीसाठी घेतले 13 लाख रुपये!
बनावट नोंदी करून केली फसवणूक
Pckhabar- एका दाम्पत्याने वकील नसताना वकील असल्याचे सांगून 13 फ्लॅटची दस्त नोंदणी करून देण्याचे सांगून एकाकडून 13 लाख रुपये घेतले. बनावट दस्त नोंदणी करून फसवणूक केली. हा प्रकार दापोडी येथे नुकताच उघडकीस आला.
प्रसन्न शिरुडकर (वय 41), शर्वरी प्रसन्न शिरुडकर (वय-40 दोघे रा. अॅड्रेसेस सोसायटी मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमित दत्तात्रय घुले (वय-42, रा. मांजरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी हे त्यांच्या ओळखीचे अँड पठाण यांना भेटणेस गेले होते. त्यावेळी अँड. शर्वरी शिरुडकर व अँड प्रसन्न शिरुडकर यांची फिर्यादीशी ओळख झाली. नंतर त्यांनी ओळख वाढवुन तुमचे दस्त करुन देतो असे सांगुन, फिर्यादीचा विश्वास संपादन केला. शर्वरी शिरुडकर व प्रसन्न शिरुडकर हे स्वतः वकील नसताना त्यांनी ते वकील असल्याचे सांगुन फिर्यादीचे मांजरी बु. येथील शारदा कॉम्पलेक्स व शारदा सुमन आर्केड या बिल्डींग मधील 13 फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करून देतो असे सांगुन, फिर्यादी कडून सातबारा उतारा 8 (अ) उतारा असे कागदपत्रे तसेच फ्लॅट विक्रीचे मूळ दस्त घेवुन 7 फ्लॅटचे असे दोन दिवसांत दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली दापोडी पुणे येथे बनावट रेरा व पीएमआरडीए नोंदणीचे कागदपत्र बनवून त्याचा वापर करून रजिस्ट्रेशन करून फिर्यादीची 13 लाख 8 हजार रूपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम तपास करत आहेत.










Leave a Reply