Pimpri Metro News : काय सांगता!
प्रवाशांना सायकलसह मेट्रोतून प्रवास करता येणार
Pckhabar-येत्या काही महिन्यात पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो सुरू होणार आहे. त्यातून प्रवाशांना सायकलसह प्रवास करता येणार आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रोने हा निर्णय घेतला आहे.
माध्यम प्रतिनिधींना याची माहिती व्हावी या हेतूने मेट्रो प्रशासनाने गुरुवारी एक कार्यक्रम घेतला.महामेट्रोचे व्यवस्थापकीय
संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी यांनी फुगेवाडी
स्थानक ते संत तुकाराम नगर स्थानक
आणि संत तुकाराम नगर स्थानक ते फुगेवाडी स्थानक असा प्रवास केला, या
प्रवासादरम्यान मेट्रोचे अधिकारी सायकल लिफ्टद्वारे फुगेवाडी मेट्रो स्थानकाच्या
फलाटावर घेऊन गेले, तेथूनमेट्रोमध्ये
सायकलसहित प्रवेश केला. मेट्रो तेथून
संत तुकाराम नगर स्थानकावर पोहचली. संत तुकाराम नगर स्थानकाच्या लिफ्टचा वापर करून सर्व सायकलसहित स्थानकाच्या बाहेर आले.
त्यानंतर सर्व सायकलद्वारे ए पी जे
अब्दुल कलाम उद्यानात गेले. आणि तेथून परत येऊन संत तुकाराम नगर स्थानक
येथून मेट्रो ट्रेनद्वारे पुन्हा फुगेवाडी
स्थानकात सायकलसहित आले. सायकल आणि मेट्रोचा वापर करून विद्यार्थी,
कामगार, कर्मचारी, महिला, सेल्समन,
वस्तूचे घरोघरी वितरण करणारे कर्मचारी इ. काम करणारे नागरिक सहजतेने मेट्रोचा वापर करू शकतात हे अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.







Leave a Reply