Pimpri Rto News : वाहन परवाना चाचणीसाठी 26 ते 31 ऑगस्ट रोजी शिबीराचे आयोजन

Pimpri Rto News : वाहन परवाना चाचणीसाठी 26 ते 31 ऑगस्ट रोजी शिबीराचे आयोजन
Pckhabar- वाहन परवाना चाचणीसाठी 26 ते 31 ऑगस्ट रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड अंतर्गत घेण्यात येणा-या वाहन परवाना करीताच्या ऑनलाईन अपॉईंटमेंटचा प्रतिक्षा कालावधी कमी करण्याच्या उददेशाने तसेच ज्या अर्जदारांचे शिकाऊ परवाना मुदत सप्टेंबर 2021 महिनाअखेर पर्यंत संपत असलेल्या अर्जदारांसाठी या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. याची संबंधीत अर्जदारांनी नोंद घ्यावी व त्याप्रमाणे उपलब्ध ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याची कार्यवाही पुर्ण करावी. त्या अनुषंगाने (स्लॉट बुकींग करुन) माहे ऑगस्ट 2021 मधील दिनांक 26.08.2021 ते 31.08.2021 रोजी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 8.00 ते 11.00 परवाना चाचणी करीता नियोजीत वेळेप्रमाणे हजर रहावे. परवाना उपलब्ध कोटा 60 असून कोटा उपलब्ध होण्याची वेळ व दिनांक 26 ऑगस्ट 2021 ते 31 ऑगस्ट 2021 कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 8 ते 11 आहे.
तरी संबंधित सर्व अर्जदारांना सूचित करण्यात येते कि, चाचणीकरीता येताना चेह-यावर मास्क व हॅड ग्लोव्हज घालणे बंधनकारक आहे. तसेच सोशल डिस्टंन्सींगचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *