Pimpri News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची बदली
Pckhabar- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आणि पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची बदली करण्यात आली आहे. याबाबत सोमवारी रात्री उशिरा गृह विभागाचे सहायक सचिव कैलास गायकवाड यांनी आदेश काढला आहे. तर पोकळे यांच्या जागी
पुण्यातील दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील पोलीस खात्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचा गृह विभागाने सोमवारी रात्री उशिरा आदेश काढला आहे.
यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे ( अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड ते अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग, ठाणे शहर), त्यांच्या जागी डॉ. संजय शिंदे (अप्पर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, पुणे शहर ते अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड), सुधीर हिरेमठ (पोलिस उपायुक्त, पिंपरी चिंचवड ते पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण, पुणे, पदोन्नतीने) नियुक्ती करण्यात आली आहे.







Leave a Reply