Pimpri News : पत्रकार ज्ञानेश्वर टकले यांना मातृशोक

Pimpri News : पत्रकार ज्ञानेश्वर टकले यांना मातृशोक
Pckhabar- द न्यूज बिज टाईम्सचे संपादक ज्ञानेश्वर टकले यांच्या मातोश्री पार्वती नामदेव टकले यांचे आज (सोमवार) सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या.

पार्वती टकले यांच्यावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिल्याने त्यांची प्रकृती मध्ये सुधारणा होत होती. मात्र, अचानक त्यांचा ऑक्सिजन कमी झाल्यामुळे अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. मात्र, आज सोमवार सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी सांगवी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *