Pimpri News : स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांना जामीन मंजूर
Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांना आज (सोमवारी) न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. तर महापालिकेच्या चार कर्मचाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
एका ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. 18 ऑगस्ट रोजी अटक केली होती.
जाहिरातींचा व्यवसाय करणाऱ्या एका ठेकेदाराने स्थायी समितीमध्ये सुरू असलेल्या लाचखोरीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक ऑपरेटर) आणि अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी अटक केली होती.
लांडगे यांना जामीन मंजूर झाला असून इतर चार आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.







Leave a Reply