Pimpri News : ज्ञानार्जनातून कौशल्य विकासाची कास धरा :  कौशल्य विकास प्रमुख लायन अशोक येवले यांचे आवाहन

Pimpri News : ज्ञानार्जनातून कौशल्य विकासाची कास धरा :  कौशल्य विकास प्रमुख लायन अशोक येवले यांचे आवाहन
Pckhabar-“नक्षत्राचे देणं काव्यमंच ” चे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी २१ ऑगस्टला दिघी येथे आयोजित केलेल्या ” गुणवंत विद्यार्थी व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक ” यांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे  लायन अशोक येवले यांनी ” ज्ञानार्जनातून कौशल्याची कास धरा “असे आवाहन केले.
ज्ञान मिळविणे, ते आत्मसात करणे,त्याचा नियमित सराव, कसोटीला सकारात्मकतेने सामोरे जाणे व त्यात सातत्य राखणे या पाच  पायऱ्यांच्या माध्यमातून कौशल्य प्राप्त करून घेऊन जीवनात प्रगती करीत रहा अशा सदिच्छा त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या.


लायन्स क्लब्स इंटरनॅशनल व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने , ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक पिंपरी येथे राबविण्यात येणारे कौशल्य विकास व नोकरी मेळावे यांचा गरजूंनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन त्यांनी केले.
या सत्कार सोहळ्यात ४० महाविद्यालयातील १५० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र  आणि मुख्याध्यापकांना प्रशस्तीपत्र व मोजमाप पद्धतीचा चार्ट देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते  प्रफुल्ल भुजबळ, अमर फुगे, दत्ता हुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सर्व गुणवंतांची MS-CIT कोर्सेची फी  भुजबळ हे भरणार असून  सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

नक्षञाचं देणं काव्यमंच गेल्या १५ वर्षांपासून भोसरी परिसरातील विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी वर्गाचा सत्कार करीत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी रामदास हिंगे,उदघाटन लायन अशोक येवले, सूञसंचालन प्रा.राजेंद्र सोनवणे व आभार प्रदर्शन कवी मोहन कुदळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *