Dehuroad News : देहूरोड पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्साहात साजरे

Dehuroad News : देहूरोड पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्साहात साजरे
Pckhabar- नगरसेवक रघुवीर शेलार स्नेह ग्रुप व मालाताई महिला बचत गट यांच्यावतीने कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांसाठी देहूरोड पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. यावेळी  बचत गटातील महिलांनी  पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधून त्यांचे औक्षण केले.

गुन्हे शाखेचे  पोलीस निरीक्षक सोन्याबापू  देशमुख, पोलीस उपनिरीक्षक  प्रशांत थिटे, शाहिद पठाण, अशोक पारधी साहेब, प्रकाश चाळके, सागर शेळके, पोलीस मित्र संघटनेचे बाळू कदम, युवा उद्योजक विलास शिंदे, लक्ष्मण शेलार,  अमित भेगडे, दिनेश सिंग, अनिल शेलार, मयूर शेलार, असिफ पठाण, अभिषेक शेलार, चंद्रकांत ढवळे, प्रताप पवळे, दिलीप राठोड, संकेत पिंजण, सुशीला नरवाल, माला सेलवण, सुनीता शिंदे, दिपाली शिंदे, राजेश्वरी मते तसेच मालाताई महिला बचत गटाच्या सदस्य व नगरसेवक रघुवीर शेलार स्नेह ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक देशमुख यांनी उपस्थित महिलांना स्व:रक्षणासंदर्भात  मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन  प्रा. लक्ष्मण शेलार  यांनी केले. आभार विलास शिंदे यांनी केले.

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष
रघुवीर शेलार म्हणाले”आपण सर्व घरी राहून कुटुंबासोबत सर्व सण उत्सव आनंदात साजरे करतो. मात्र, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर  जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असते. त्यामुळे ते ऑनड्युटी आपले कर्त्यव्य चोख बजावत असतात.   त्यांना कोणतेही सण, उत्सव  कुटुंबासोबत साजरा करता येत नाही. त्यामुळे महिला बचत गटाच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *