Dehuroad News : भाजप महिला मोर्चाच्यावतीने रक्षाबंधन उत्साहात साजरा
Pckhabar-भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. किवळे-विकासनगर येथे भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांना महिला मोर्चाच्या सदस्यांनी राख्या बांधल्या.
नगरसेवक ओव्हाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाजप महिला मोर्चा ब प्रभाग अध्यक्ष निशा येवले. महिला मोर्चा उपाध्यक्ष संगीता कुंवर, सरचिटणीस रेश्मा पाटील आदी उपस्थित होत्या.
नगरसेवक ओव्हाळ यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष सुरेश नायर आणि सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ ओव्हाळ यांनाही राखी बांधली. यानिमित्ताने बहीण भावाच्या नात्याचे बंध दृढ झाले.







Leave a Reply