Pune News : दुचाकीस्वाराला दुचाकीसह टोईंग व्हॅनमध्ये भरले!

Pune News : दुचाकीस्वाराला दुचाकीसह टोईंग व्हॅनमध्ये भरले!

वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर प्रचंड संताप
Pckhabar-दुचाकीस्वाराला दुचाकीसह टोईंग व्हॅनमध्ये भरल्याल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हा प्रकार  पुण्यातील नानापेठ परिसरात गुरूवारी दुपारी घडला असून वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

संबंधित दुचाकीस्वाराची दुचाकी नो-पार्किंग झोनमध्ये असल्याचा दावा पोलिसांनी केला असून त्यामुळे ही कारवाई केली आहे.  नो-पार्किंगमध्ये गाडी असली तरी कारवाईची ही पद्धत कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 सर्वाधिक दुचाकी वाहनाचे पुणे शहराची ओळख झाली आहे. त्यामुळे  पुणे शहरात दिवसेंदिवस पार्किंगची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वाहतूक पोलीस आणि चालकांमध्ये अनेकदा वादा-वादीचे प्रसंगही घडत आहेत. वाहतूक पोलिसांची अरेरावी करणारेे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले आहेत. नानापेठ परिसरात घडलेली घटना ही त्यापैकीच एक. या घटनेवरुन  पुणे वाहतूक पोलिसांवर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.  तसेच  अशा चुकीच्या पद्धतीने कारवाई करताना दुचाकीस्वार गाडीवरून पडला असता आणि मार लागला असता तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *