Pimpri News : पिंपरी-चिंचवड कल्चरल फौंडेशनचा संवाद मेळावा संपन्न
Pckhabar- देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विजयराव भिसे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथे नुकताच चहापान आणि संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात फाउंडेशनच्या आगामी ध्येय धोरणांबाबत तसेच राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत चर्चा व विचार विनिमय करण्यात आला.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड मनपाचे माजी अतिरिक्त आयुक्त अमृतराव सावंत , पिंपरी येथील सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉ अमरसिंह निकम , प्रसिद्ध संगीत नाट्य अभिनेते गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे , नगरसेविका सुजाता पालांडे ,वरिष्ठ अभियंता व गायक सतीश इंगळे , सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा बिडकर , मानवाधिकारचे अनिल म्हाळसकर , उद्योजक शहाजी बारणे ,गजलकार संतोष घुले , प्रसिद्ध निवेदक विजय बोत्रे पाटील ,सुनील थोरात ,पोपट काटे ,शाम कुंजीर ,जीवन भोपे , उद्योजक निरंजन भिसे, प्रथमेश भिसे, प्राजक्ता पवार, आर्ट डायरेक्टर निलांबरी भिसे आणि अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फौंडेशनचे युवा कार्यकर्ते अजिंक्य भिसे आदि मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी आणि नियोजनबद्ध कार्यक्रमांसाठी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी कला , क्रीडा, साहित्य , संगीत, नाट्य ,अभिनय आदींसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान या कल्चरल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष विजयराव भिसे यांनी सांगितले.






Leave a Reply