Pimpri Acb Reid News : पिंपरी महापालिकेत पडलेल्या अँटिकरप्शन्स धाडीचा खरा “घटनाक्रम वाचा…”

Pimpri Acb Reid News : पिंपरी महापालिकेत पडलेल्या अँटिकरप्शन्स धाडीचा खरा “घटनाक्रम वाचा…”
Pckhabar-भारतीय जनता पक्ष सत्तेत असणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काल दि 18 ऑगस्ट 2021 रोजी सांयकाळी 5.00 वा अँटिकरप्शन विभागाची धाड पडली. यामध्ये स्थायी समितीचे सभापती व त्याच विभागात काम करणारे एक मुख्य लिपिक,एक क्लार्क,एक संगणक ऑपरेटर व एक शिपाई अशा पाच जणांना अटक करण्यात आली.

संपूर्ण राज्यभर खळबळ उडवून देणारी घटना नेमकी कशी व किती वाजता घडली याबाबत सविस्तर वाचा..!

■ जाहिरात एजन्सी चालविणाऱ्या फुगेवाडी येथील एका ठेकेदाराने पिंपरी महापालिकेच्या जागेत “होर्डिंग्ज उभारणे कामी” पिंपरी महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी निविदा प्रसिद्ध केल्या. तक्रारदार ठेकेदाराने निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यामध्ये त्यांच्या 28 निविदा मंजूर झाल्या.

■ संबंधित ठेकेदाराने यांच्या 28 निविदा मंजूर करण्यासाठी स्थायी समितीने प्रथम 3 टक्के कमिशन म्हणजे 10 लाख रुपये मागितले व त्यांनतर तडजोड म्हणून 2 टक्के प्रमाणे कमिशनचे 6 लाख रुपये मागणी केल्याचे ठेकेदाराने तक्रारी अर्जात म्हटले आहे.

■ *दिनांक 13 व 17 ऑगस्ट 2021*
स्थायी समिती विरोधी ठेकेदाराने केलेल्या तक्रारी अर्जाबाबत अँटिकरप्शन विभागाच्या वतीने दि 13 व 17 ऑगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली

■ *काल महापालिकेत घडलेला घटनाक्रम!*

■ *सांयकाळी :04.40 वा.* स्थायी समितीची साप्ताहिक बैठक संपली.

■ *सांयकाळी: 04.55 वा.*
आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची पत्रकारांना देण्यासाठी स्थायी समितीच्या दालनात पत्रकार एकत्र जमा.

■ *सांयकाळी : 05.01 वा* तक्रारदार ठेकेदार व स्थायी समिती सभापती स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसन पिंगळे यांची महापालिका मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील पार्किंगच्या जागेत उभ्या असलेल्या चार चाकी गाडीत भेटले व तेथेच कमिशनची रक्कम म्हणून *1 लाख 18 हजार* ( 6 निविदा फाईल्सवर मंजुरीचे कमिशन म्हणून) पिंगळे यांच्या ताब्यात दिली.
व त्याच वेळी दबा धरून बसलेले अँटिकरप्शनचे 7 ते 8 अधिकारी व कर्मचारी यांनी पिंगळे व ठेकेदारला ताब्यात घेतले.

■ *सांयकाळी 05.04 वा.* ठेकेदाराने पिंगळे यांना दिलेले रु 1 लाख 18 हजार कमिशनचे पैसे व आणि पिंगळे यांना अटक करून अँटिकरप्शन विभागाचे अधिकारी व 15 ते पोलिसांच्या सोबत पिंपरी महापालिका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्थायी समितीच्या कार्यालयात हजर .

■ *सांयकाळी :05.10 वा* स्थायी समितीचे कार्यालय अँटिकरप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात.

■ *सांयकाळी 05.15 वा*
अँटिकरप्शन विभागाची धाड महापालिका इमारतीमध्ये पडल्याची बातमी वाऱ्यासारखी इमारतीमध्ये उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यामध्ये पसरली.काही अधिकारी कार्यालयातून झाले गायब.

स्थायी समितीचे सभापती यांची चौकशी महापौर यांच्या दालनात सुमारे दोन तास सुरू.
तर दुसरीकडे म्हणजे स्थायी समितीच्या कार्यालयात तक्रारदार ठेकेदार यांच्या सांगण्यावरून सभापतींचे मुख्य लिपिक व स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे,लिपिक (केवळ पाच दिवसांपूर्वी या ठिकाणी बदली होऊन आलेले) विजय संभुलाल चावरीया,संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंतराव शिंदे व शिपाई अरविंद भीमराव कांबळे चार कर्मचाऱ्यांची चौकशी.
■ *सांयकाळी 05.30 दरम्यान* पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघमारे पोलीस ताफ्यासह पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर हजर राहून चौकशी सूरु असलेल्या ठिकाणचा घेतला ताबा.

■ *सांयकाळी:06.00 वा*
स्थायी समिती कार्यालयातील झाडाझडती. संबंधित उपलब्ध साहित्य व रोख (आकडेवारी सांगण्यात आली नाही) जमा करण्यात आली.

■ *सांयकाळी 06.42 वा*
अँटिकरप्शन विभागाची चौकशी पूर्ण.

■ यावेळी विविध वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक्स व सोशल मीडिया माध्यमांचे प्रतिनिधी व फोटोग्राफर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

■अँटिकरप्शन विभागाच्या वतीने प्रसार माध्यमांना कसलीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

■ *सांयकाळी 06.47 वा*
स्थायी समितीचे सभापती नितीन लांडगे यांना पोलिसांच्या एका चार चाकी गाडीमध्ये व दुसऱ्या पोलिसांच्या चार चाकी गाडीमध्ये पिंगळे,शिंदे,चावरिया व कांबळे यांना अटक करून महापालिकेच्या इमारतीच्या बाहेर चौकशीसाठी अँटिकरप्शनच्या कार्यालयाकडे नेण्यात आले.

■ पिंपरी महापालिकेच्या इमारतीमध्ये काल पडलेल्या धाडीमध्ये अँटिकरप्शन्स पुणे विभागाचे पोलीस उपायुक्त श्री राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव,अधिकारी सुहास नाडगौडा,यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सीमा मेहंदळे यांनी पुणे अँटिकरप्शन्स पुणे युनिटमधील पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील
पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे, पोलीस हवालदार श्रीमती सरिता वेताळ,अश्पाक इनामदार,अंकुश माने,अविनाश इंगुळकर,पोलीस शिपाई चंद्रकांत कदम यांच्या सहकार्याने कारवाई यशस्वी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *