Pimpri News : खळबळजनक! महापालिकेच्या स्थायी समिती कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा
शहरात एकच खळबळ
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या कार्यालयावर आज (बुधवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकला आहे. स्थायी समितीची सभा सुरू असतानाच टाकण्यात आलेल्या या धाडीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज (बुधवारी) होती. सभा चालू झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी स्थायी समितीच्या कार्यालयावर धाड टाकली. अचानकपणे पडलेल्या धाडीमुळे पालिकेच्या तिसर्या मजल्यावर एकच खळबळ उडाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तीन पुरुष व एक महिला अधिकारी स्थायी समितीच्या कार्यालयामध्ये अचानक आले. स्थायी समितीच्या अध्यक्षांचे स्वीय सहायकाच्या कार्यालयाचा ताबा घेत कुलूपबंद केले.
दरम्यान, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समितीवर छापा पडल्याने राजकीय वतुर्ळातसह शहरात एकच खळबळ उडाली आहे.










Leave a Reply