Pimpri News : ‘आत्मनिर्भर भारत’ही चळवळ दुसरी स्वातंत्र्य प्राप्तीची नांदी ठरेल – राहुल पाटील

Pimpri News : ‘आत्मनिर्भर भारत’ही चळवळ दुसरी स्वातंत्र्य प्राप्तीची नांदी ठरेल – राहुल पाटील
Pckhabar-आत्मनिर्भर भारत होण्याची गरज कोरोनामुळे जाणवली आहे.
घरच्या घरी कोरोना चाचणी करण्याचे किट स्वतः तयार करून आत्मनिर्भर भारताने हेतूने टाकलेले पाऊल आहे. अशा काळात “आत्मनिर्भर भारत” ही चळवळ दुसऱ्या स्वातंत्र्यप्राप्तीची नांदी ठरेल. असा विश्वास माय लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल पाटील यांनी व्यक्त केला.

आकुर्डी येथील डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी डी.वाय.पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील,डीवायपाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रभात रंजन,शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ नीरज व्यवहारे सर्व कॉलेजचे प्राचार्य,प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
लोकमान्य रुग्णालयाचे डॉ श्रीकृष्ण जोशी,जीवनरेखा रुग्णालयाचे डॉ राजेंद्र चावट,वायसीएम रुग्णालयातील नर्स विभागाच्या प्रमुख संगीता पाटील यांचा कोरोना वारियर्स म्हणून सत्कार करण्यात आला.

राहुल पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये आत्मनिर्भर भारत होण्याची गरज कोरोनामुळे जाणवते आहे,असे नमूद केले
त्यांनी त्यांच्या कंपनीमार्फत घरच्या घरी करण्याची चाचणी करण्याचे किट स्वतः तयार करून आत्मनिर्भर भारताच्या उद्देश स्पष्ट केलेला आहे.
यावेळी त्यांनी महाविद्यालयांनी विविध कंपन्यांची परस्पर सहकार्य करून भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत असे आव्हान सुद्धा केले.

डॉ. नीरज व्यवहारे यांनी भारत स्वतंत्र झाला तरी भारताला स्वयंपूर्ण होऊन पुन्हा ही स्वातंत्र्याची लढाई करण्याची गरज असल्याचे नमूद केले.

कोरोना काळामध्ये औषधासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी भारताला चीन आणि अमेरिकेवर अवलंबून राहावे लागले त्यामुळे या संदर्भात भारताने स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. असेही डॉ.नीरज व्यवहारे यांनी सांगितले.
प्रभात रंजन यांनी रोबोटच्या तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या काळात हा भारताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे, असे त्यांनी केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ शलाका पारकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *