Dehu News : माजी आमदार वै.श्यामकांत मोरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त काव्य मंचास काव्यसंग्रह भेट
Pckhabar- श्रीक्षेत्र देहूचे थोर सुपुत्र, स्वातंत्र्य सैनिक, माजी आमदार वै.श्यामकांत मोरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व त्यांचे सुपुत्र वाचनवेड संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर वाचनाचे संस्कार रुजविण्यासाठी सदैव कार्यरत असणारे सेवाभावी व्यक्तिमत्त्व आदरणीय किरीटी शामकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज (मंगळवार) ‘इंद्रायणी आहे साक्षीला’ या काव्य मंचास विविध नामांकित कवींचे काव्यसंग्रह भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी इंद्रायणी आहे साक्षीला या काव्यमंचच्या नवोदित कवींनी कविता सादर केल्या. याप्रसंगी संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. मधुकर महाराज मोरे इनामदार, कीर्तनकार संत सेवक, ह.भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे इनामदार, डॉ. विवेकानंद मोरे सर, ज्येष्ठ लेखक दादाभाऊ गावडे, विजय चव्हाण, इंद्रायणी आहे साक्षीला काव्यमंचाचे प्रमुख डॉ. अहेफाज मुलाणी, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश मोरे, अभंग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, सुरेश गाडे, सचिव सलीम मुलाणी, अजिंक्य साकोरे, दिनेश साळुंके अभिजित कंद, श्री चंदन सुतार, रुपाली आढाव, सविता दिवेकर, सागर घरबुडवे, अनुराग हिंगे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विकास कंद यांनी केले. आभार डॉ. अहेफाज मुलाणी यांनी मानले.







Leave a Reply