Lonavala News : लोणावळा नगरपरिषद व रेल्वे कडून नागरिकांना रेल्वे पास देण्याची सुविधा उपलब्ध
Pckhabar- कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आता लोणावळा पुणे रेल्वे प्रवास करता येणार आहे . या प्रवासासाठी आवश्यक असणारा सिझन अथवा मासिक पास स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या होत्या. लोणावळा नगरपरिषदेने नागरिकांसाठी ही सुविधा रेल्वे तिकिट घराजवळच उपलब्ध करून दिली आहे . त्यामुळे नागरिकांना पास घेण्यासाठी नगरपरिषद कार्यालय अथवा अन्यत्र कोठे जाण्याची आवश्यकता नाही असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे .
लोणावळा नगरपरिषद कार्यालयात मंगळवारी नगरपरिषद पदाधिकारी व रेल्वे पदाधिकारी यांची बैठक पार पडली . यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव , उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल , ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी , सुर्वणा अकोलकर , ललित सिसोदिया , भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल , लोणावळा स्टेशन मास्तर आर.पी.सिंग , रेल्वे ट्राफिक इन्स्पेक्टर रणजित कुमार व चिप इन्स्पेक्टर जॉन सुरेन आदी उपस्थित होते . ज्या नागरिकांचे कोरोना लसीचे दोन डोस झाले आहे . त्यांनी दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र व आधारकार्ड हे दाखविल्यास त्यांना मंथली पास देता येईल . याकरिता लोणावळा नगरपरिषदेचे चार कर्मचारी व रेल्वे कर्मचारी हे लोणावळा रेल्वे स्थानकावर दोन्ही तिकिट घराच्या बाहेर रोज सकाळी 7 ते 10 व दुपारी 4 ते सायंकाळी 7.30 दरम्यान काऊंटर लावून बसणार आहेत . त्याच ठिकाणी लस घेतल्याचे प्रमाणपत्राचे व्हेरिफिकेशन करून त्यावर नगरपरिषदेचा शिक्का घेत नागरिकांना पास देण्यात येणार आहे . पास हा मासिक असेल केवळ एक दिवसाचे तिकिट मिळणार नाही असे स्टेशन मास्तर आर.पी.सिंग यांनी सांगितले .










Leave a Reply