Talegaon Dabhade Accident News : पादचार्‍याला डंपरने चिरडले

Talegaon Dabhade Accident News : पादचार्‍याला डंपरने चिरडले
Pckhabar- रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एकाला भरधाव वेगातील डंपरने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी दहा वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर, सोमाटणे खिंडीत दर्ग्याजवळ घडली.

सिद्धाथ मुसंडी (वय 44, रा. तळेगाव दाभाडे) असे मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. आरोपी डंपर चालक मंगेश तिखे (वय 32, रा. शिंदेवस्ती, रावेत, ता. हवेली) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास मृत सिद्धार्थ हे सोमाटणे खिंडीतून पायी चालत जात होते. दर्ग्याजवळ आल्यानंतर तळेगावकडून पुण्याच्या दिशेने एक डंपर (एम एच 14, जी डी 7837) भरधाव वेगात आला. डंपरने सिद्धार्थ यांना धडक देऊन चिरडले. सिद्धार्थ काही अंतरापर्यंत डंपरखाली घासले गेले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक मंगेश याचे डंपरवरील नियंत्रण सुटले आणि डंपर महामार्गावर पलटी झाला. त्यामुळे काही वेळ पुण्याकडे येणार्‍या एका लेनवर वाहतूक कोंडी झाली. तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने डंपर बाजूला घेतला. त्यानंतर वाहतूक सुरळीत केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *