Dighi News : दिघीमध्ये ‘स्लो’ सायकल स्पर्धा उत्साहात संपन्न
Pckhabar- १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मॅविक सायकल क्लब आयोजित व पै. ज्ञानेश आल्हाट यांच्या सैजन्याने स्लो सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रगीत घेऊन व भारत माता की जय घोषणा देत स्पर्धेचे उद्धघाटन माजी नगरसेविका आशा सुपे, ज्ञानेश आल्हाट , अतुल चव्हाण ( सायकल पटू महा राज्य ) , दिघी विकास मंच अध्यक्ष हारिभाऊ लबडे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेमध्ये ऐकुण ४० सायकल पटूनी भाग घेतला होता. विजयत्या स्पर्धकांना दोन गटांमध्ये प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांकास मानचिन्ह व प्रमाणपत्रक आणि दोन स्पर्धकांना उत्कृष्ट सायकल पटू मानचिन्ह देण्यात आले.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक सायकल पटूनां प्रमाणपत्रक देण्यात आले.
खेळाडूंना आहार व व्यायामचे मार्गदर्शन अतुल चव्हाण ( सायकलपटू महा राज्य ) यांनी केले.
स्लो सायकल स्पर्धेचे परिक्षेक दत्ता घुले यांनी पाहिले. याप्रसंगी दिघी विकास मंचाचे सुनिल काकडे, धनाजी खाडे , विकी आकुलवार, नामदेव रढे, के के जगताप, समाधान कांबळे , पांडूरंग म्हेत्रे, रमेश विरनक, अमोल देवकर , बाळू सुपे , संदिप कनसे, दत्ता माळी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मॅविक सायकल क्लबचे निखिल बोबले, जुनेद मुलाणी, मयुर पिंगळे, सुभाष पिंगळे , ओंकार राऊत, विकी गवर , कुलदिप कोकाटे आदींनी परिश्रम घेतले.







Leave a Reply