Dehu News : गुणवंत कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल वरिष्ठ तंत्रज्ञ गोविंदा चोपडे यांचा अभंग प्रतिष्ठानतर्फे सन्मान
Pckhabar-महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण आचे देहूगाव शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ गोविंदा विलास चोपडे यांना महावितरणच्या पुणे झोन स्तरावर गुणवंत कर्मचारी म्हणून पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल श्री क्षेत्र देहुतील अभंग प्रतिष्ठानच्या वतीने व देहू ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अभंग प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, विकास कंद, देहू विविध विकास कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन नारायण पचपिंड व संतसेवक, कीर्तनकार शिरिष मोरे, वरिष्ठ तंत्रज्ञ कृष्णा आरूडे यांनी मनोगतातून सदिच्छा व्यक्त केल्या. महावितरणच्या सर्व कर्मचारी बांधवांचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले.
अनेकदा जीवाची पर्वा न करता या सर्व कर्मचाऱ्यांकडून लोकसेवा केली जाते. याविषयी समाजाने त्यांच्या कामाकडे संवेदनशीलतेने पहाणे गरजेचे आहे. या कर्मचारी बांधवांच्या विशेष कार्याचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊनच अभंग प्रतिष्ठानने गोविंदा चोपडे यांच्या केलेल्या विशेष सन्मानाचे ग्रामस्थांकडून ही कौतुक करण्यात आले.
याप्रसंगी अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष, प्रवीण काळोखे, उपाध्यक्ष, सुरेश गाडे, सचिव, सलीम मुलानी, सचिन काळोखे, दिनेश साळुंखे, अजिंक्य साकोरे, पै. संदीप आव्हाळे, प्रा. विक्रम भोईटे, शिरीष मोरे, लक्ष्मण काळोखे, विकास कंद व देहूगाव शाखेतील महावितरण मंडळाचे सर्व कर्मचारी बंधू उपस्थित होते.






Leave a Reply