indian idol 12 winner : पवनदीप राजन ठरला इंडियन आयडॉल!

indian idol 12 winner : पवनदीप राजन ठरला इंडियन आयडॉल!
Pckhabar-मुंबई : Indian Idol 12 च्या बाराव्या सिझनची ट्रॉफी पवनदीप राजनने जिंगली आहे. या यशामुळे संपूर्ण भारतातील गीत-संगीत रसिक पवनदीप राजनचे अभिनंदन करत आहेत. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पवनदीप राजनला ही खास भेट मिळाली असून त्याला रोख 25 लाख रुपये आणि 1 महागडी कार देखील बक्षीस म्हणून मिळाली आहे.

या कार्यक्रमाचे परिक्षक सोनू कक्कर, अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्या व्यतिरिक्त, विशाल दादलानी, ग्रेट खली या सेलिब्रिटींनी या फायलन सिझनमध्ये आपला सहभाग नोंदवला. इंडियन आयडॉल 12 च्या सहा फायनलिस्ट्समध्ये चांगलीच चुरस रंगली होती. मात्र सर्व पाच स्पर्धकांना मागे टाकत इंडियन आयडॉलच्या 12 व्या सिझनच्या ट्रॉफीवर उत्तराखंडच्या पवनदीप राजनने आपले नाव कोरले.

पहिला क्रमांक – पवनदीप राजन (विजेता)

दुसरा क्रमांक- अरुणीता

तिसरा क्रमांक- सायली

चौथा क्रमांक- मोहम्मद दानिश

पाचवा क्रमांक- नेहाल

सहावा क्रमांक – षण्मुखप्रिया