pimpri News : नवमहाराष्ट्र विद्यालयात ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
Pckhabar-स्वातंत्र्यदिनाच्या (७५व्या) अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
पिंपरीतील रयत संकुलाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम साजरा झाला. यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, नवमहाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक. श्री.उत्तम पाटील , कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे, नवमहाराष्ट्र विद्यालयाचे उपमुख्याध्यापक प्यारेलाल शेख, नवमहाराष्ट्र विद्यालयाचे पर्यवेक्षक शरद परदेशी, पर्यवेक्षिका शुंभागी गमे, कन्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका उर्मिला पाटील तसेच नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समीतीचे चेअरमन भाऊसाहेब वाघेरे पाटील, कन्या विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य हनुमंतराव नेवाळे व सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ उपस्थित होते.
आपण सर्वजण मिळून कोरोना वर मात करू, असा विश्वास यावेळी डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी व्यक्त केला. ध्वजारोहण कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे संचलन निता शेटे यांनी केले.






Leave a Reply