Pimpri Crime News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या ठेकेदाराला बेड्या

Pimpri Crime News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या ठेकेदाराला बेड्या
Pckhabar-  मुळशी तालुक्यातील माणगाव येथे 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैगिंक अत्याचार करणार्‍या नराधम ठेकेदाराला पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

अर्जुन उर्फ पंडित राजू साळुंखे (वय-29, साळुंके वस्ती, माण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैगिंक अत्याचार झालेली अल्पवयीन मुलगी आणि तिच्या सात महिन्याच्या बाळाचे सांगली येथिल आटपाडी या मुळ गावी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. पीडित मुलीचे आई-वडील पीडित मुलीला घेऊन मुळशी तालुक्यातील माणगाव या ठिकाणी एका ठेकेदाराकडे मौल-मजुरी करण्यासाठी आले होते. दरम्यान त्याच ठिकाणी आरोपी ठेकेदाराने पीडित मुलीवर दोन महिने वारंवार लैगिंक अत्याचार करून पीडित मुलीला सात महिन्याच गरोदर केले होत. मात्र पीडित मुलगी सांगली येथील आटपाडी या मूळ गावी गेली असता त्याठिकाणी पीडित मुलीची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे तिचा आणि तिच्या सात महिन्याच्या बाळाचा आटापाडी गावात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *