Talegaon Dabhade News : मला बदनाम करणे सोपे नाही; आमदार सुनील शेळके यांचे विरोधकांना आव्हान

Talegaon Dabhade News : मला बदनाम करणे सोपे नाही; आमदार सुनील शेळके यांचे विरोधकांना आव्हान
Pckhabar- गेल्या दीड-पावणेदोन वर्षांपासून मावळच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडे विकास कामासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे. माझ्या चांगल्या कामात अडथळा निर्माण करण्याचे विरोधकांकडून प्रयत्न केले जात आहे. स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधक राज्य पातळीवरून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम केले जात आहे. मात्र, मला बदनाम करणे सोपे नाही, असे आव्हान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांना दिले.

तळेगाव दाभाडे येथे आज ( शनिवार) झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार शेळके बोलत होते.

मावळ तालुक्यातील आंबळे गावी बेकायदा गौण खनिजाचे उत्खनन सुरू असून आमदार सुनील शेळके यांनी शासनाचा 10 कोट्यावधी रूपयांचा महसूल बुडल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला होता. तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली होती. या आरोपाचे आमदार शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन खंडन केले आहे.

माझा कायदेशीर व्यवसाय सुरू असून सोमय्या यांनी एकही पुरावा नसताना आरोप केले आहेत. त्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे, असे सांगून आमदार शेळके म्हणाले, मी नियमाप्रमाणे जीएसटी, व्हॅट भरत आहे. माझे एकही चुकीचे काम नसून दीड वर्षात माझ्यावर चुकीचे काम केल्याचा आरोप नाही. ज्या दिवशी चुकीचे काम करेल त्या दिवशी जाहीर माफी मागून मी स्वतःहून खुर्चीवरून पाय उतार होईल, असेही शेळके यांनी स्पष्ट केले.

आमदार शेळके पुढे म्हणाले की”
गेल्या दीड-पावणेदोन वर्षांपासून मावळच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. 15 ते 20 वर्षांच्या कामाचा बॅकलाॅक भरून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडे विकास कामा संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळेच मावळ तालुक्यासाठी 2 उपजिल्हा रूग्णालय, 11 पुल, रस्त्यांसाठी आणि महामार्गासाठी साडेतीनशे कोटींचा निधी मंजूर झाला आहे. माझ्या चांगल्या कामात अडथळा निर्माण करण्याचे विरोधकांकडून प्रयत्न केला जात आहे.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *