…जेव्हा अजितदादा जेव्हा मनसे नगरसेवकावर भडकतात
Pckhabar- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्ट आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय आज आला. पवार आज शहर दौ-या दरम्यान आला. मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हे अजित पवारांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत होते. ते खूप जवळ आल्याने फिजिकल डिस्टन्स ठेव की, चार ते पाच मंत्री बाधित झाले आहेत. लांबून बोल असे सांगत अजितदादा त्यांच्यावर भडकले. त्यामुळे चिखले प्रश्न न सांगताच बाजूला झाले.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार, पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडी आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एकत्रितपणे नेहरूनगर येथे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज शहरात आले होते. त्यांनी कामाची पाहणी केली. पाहणी करताना मात्र फिजिकल डिस्टनसचा सर्वांना विसल पडला होता.
पाहणी करुन अजित पवार गाडीकडे जात असताना पालिकेतील मनसेचे गटनेते सचिन चिखले हे पवार यांच्याजवळ आले. ते त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी अजित पवार यांनी फिजिकल डिस्टन्स ठेव की, चार ते पाच मंत्री बाधित झाले आहेत. आम्ही कसे काम करतो आम्हाला माहिती आहे. लांबून बोल असे सांगत भडकले. त्यामुळे चिखले प्रश्न न सांगताच बाजूला झाले.
याबाबत सचिन चिखले यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, तो होवू शकला नाही.










Leave a Reply