Talegaon Dabhade Crime News : व्यवसायात गुंतवणुकीचे अमिष दाखवून तरूणाची चार लाखांची फसवणूक
Pckhabar-व्यवसायात गुंतवणुकीचे अमिष दाखवून एकाने तरूणाची चार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार तळेगाव दाभाडे शहरात उघडकीस आला आहे. हा प्रकार 14 डिसेंबर 2018 ते 14 सप्टेंबर 2019 या कालावधीत घडला.
सागर रघुनाथ राऊत (रा. अगाशी रोड, विरार) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी योगेश ज्ञानेश्वर उभे (वय-38, रा. सुप्रिया अपार्टमेंट, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने उभे यांचा विश्वास संपादन करून सात लाख रूपये ऑनलाईन बॅकेमार्फत खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर आरोपीकडे उभे यांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्याने तीन लाख रूपये फिर्यादी यांना दिले. मात्र, उर्वरित चार लाख रूपये न देता त्यांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक मतकर तपास करत आहेत.














Leave a Reply