Pimpri Fraud News : अबब… दि सेवा विकास बँकेत 429 कोटींचा गैरव्यवहार

Pimpri Fraud News : अबब… दि सेवा विकास बँकेत 429 कोटींचा गैरव्यवहार

तत्कालीन संचालक मंडळासह 37 जणांवर गुन्हा

Pckhabar-आर्थिक अनियमितता, अपहार, फसवणुक आणि लबाडी करून  429 कोटी रूपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी दि सेवा विकास बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी, कर्जदारांसह 37 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा प्रकार  दि सेवा विकास को ऑप बँक मुख्य शाखा, पिंपरी येथे घडला.

याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज (गुरूवार) पत्रकार परिषदेत माहिती दिली.

तत्कालीन चेअरमन माजी उपमहापौर अमर साधुराम मूलचंदानी, संचालक मनोहर साधुराम मूलचंदानी, डॉ. गुरुबक्ष मतनानी, विजयकुमार गोपीचंद रामचंदानी, नरेंद्र पांडुरंग ब्राह्मणकर, पंकज प्रकाश मसंद, धीरज साधू भोजवानी, भारती प्रकाश नंद, दया अशोक मूलचंदानी,  दीपा जीवत मंगतानी, राजेश पोपट सावंत, चंद्रशेखर अहिरराव, अशोक साधुराम मूलचंदानी, प्रकाश शिवनदास पमनानी,  मुख्य कार्यकारी अधिकारी टी. एन. लखानी, मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एम. बासी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच टी मुलानी (मयत), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल शर्मा, सहमुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. हिंदुजा, सहाय्यक व्यवस्थापक तथा कर्ज विभाग प्रमुख विजय चांदवानी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भगवानी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी सीमा सूर्यवंशी, उपव्यवस्थापक तथा कर्ज विभाग प्रमुख विजय चांदवानी, सहायक व्यवस्थापक आणि कर्ज विभाग प्रमुख निलम सोनवाणी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जे. पी. जगवानी, कर्जदार आरोपी सागर सुर्यवंशी व शितल सुर्यवंशी (तेजवाणी), विनय आर्‍हाना, विवेक आर्‍हाना, दिप्ती आर्‍हाना, रोझसी ग्लोबल एज्युकेशन, धमेंद्र ब्रिजलाल सोनकर व सोनकर समुह यांच्यासह 37 कर्जदार समूह आणि व्यक्तीगत  कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) राजेश उद्धवराव जाधवर (वय-50) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी जाधवर यांनी बँकेच 50 लाखांच्या वरील कर्ज प्रकरणाचे लेखापरीक्षण करून 6 ऑगस्ट रोजी अहवाल सादर केला आहे.

या अहवालामध्ये  आरोपींनी संगनमत, पूर्वनियोजित कटकारस्थान रचून कर्जदाराची कर्ज परतफेड क्षमता न पाहता, अपुरे तारण असताना मालमत्तेचे मूल्यांकन कमी असताना, तारण मालमत्ता विक्रीयोग्य व निर्वेध नसताना कर्ज रक्कम वितरित केली. कर्जदाराने वितरित कर्ज रकमेचे वक्रवहन व गैरविनियोग केल्याने तसेच पूर्वीची थकीत कर्ज खाती नियमित व परतफेड करण्यासाठी कर्जनिधीचा वापर केल्याने बँकेने कर्जदाराला विशेष अनुकूलता ठेऊन कर्ज मंजूर केले. बँकेचे लेखापरीक्षण दरम्यान 124 कर्ज प्रकरणात 429 कोटी 57 लाख रूपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. आरोपींवर विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *