Dehu News : युवा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Dehu News : युवा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Pckhabar-भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहर याठिकाणी देहु शहरातील येथील कुणाल कांबळे व त्यांच्या सुमारे ३० युवा सहकाऱ्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेशतात्या भेगडे, मावळ अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.

यावेळी कुणाल कांबळे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मावळ तालुका उपाध्यक्ष पदी निवड करत असल्याची घोषणा रवींद्र भेगडे यांनी केली. यावेळी मावळ भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी कुणाल कांबळे यांची निवड झाल्याबद्दल माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व  जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित पंचायत समिती माजी सदस्य सुहास गोलांडे, बाळासाहेब काळोखे उपाध्यक्ष भाजप पुणे जिल्हा, प्रभारी कैलास अण्णा पानसरे, तुकाराम नाना जाधव , अध्यक्ष रविंद्र माने, उपसरपंच स्वप्नील काळोखे, मा.अध्यक्ष तात्या पचपीड, संतोष हगवणे, रायबा मोरे , योगेश पचपिंड, पवण मोरे, सागर मुसूडगे, अनिरुद्ध काळोखे, संभाजी टिळेकर, सुयश टिळेकर, सचिन काळोखे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *