Pimpri News : एमआयडीसीचा गुरुवारचा पाणीपुरवठा बंद

Pimpri News : एमआयडीसीचा गुरुवारचा पाणीपुरवठा बंद
Pckhabar-महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रामधील देखभाल व दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी (दि.12) करण्यात येणार आहे. त्यामुळे एमआयडीसी गुरुवारचा पाणीपुरवठा सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता कल्पेश लहिवाल यांनी दिली.

एमआयडीसीकडून होणाऱ्या पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, दिघी, व्हीएसएनएल, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

शुक्रवारी (दि.13) पाण्याचा पुरवठा हा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करावा. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहनही कार्यकारी अभियंता कल्पेश लहिवाल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *