Chinchwad News : युवक काँग्रेसच्या वतीने लाडु वाटप करून ऑलिम्पिक खेळाडूंचे अभिनंदन

Chinchwad News : युवक काँग्रेसच्या वतीने लाडु वाटप करून ऑलिम्पिक खेळाडूंचे अभिनंदन
Pckhabar- 9 ऑगस्ट भारतीय युवक काँग्रेसचा स्थापना दिन म्हणून साजरी करण्यात येतो. यादिवासाचे अवचित्य साधून ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंना मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल आज चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने चापेकर चौक येथे माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांच्या हस्ते नागरिकांना लाडु वाटप करून आनंद साजरी करण्यात आला.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयुर जयस्वाल, शहर काँग्रेस उपाध्यक्ष मकरध्वज यादव, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, कुंदन कसबे, विशाल कसबे, वसीम शेख, प्रवक्ते गौरव चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे, नीता चामले, विकास सानप, माऊली जवेरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

गेली दीड वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमध्ये सगळीकडे नकारात्मक वातावरण आहे, नागरीक तणावाखाली आहेत. या मध्ये टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंनी विविध पदके मिळवत देशात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे.

यामध्ये मीराबाई चानू
भारोत्तोलन मध्ये रौप्य पदक (महिला 49 किलो), भारतीय हॉकी संघ
पुरुष हॉकी स्पर्धेत कांस्य पदक,पीव्ही सिंधू-महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक, लवलिना बोर्गोहेन
-महिलांच्या वेल्टरवेट बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक, रवि कम दहिया
-पुरुषांच्या 57 किलो कुस्तीमध्ये रौप्य पदक, बजरंग पुनिया-पुरुषांच्या फ्रीस्टाईल 65 किलो कुस्तीमध्ये कांस्यपदक व सर्वात मोठे पदक नीरज चोप्रा यांना पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. सर्व भारतीयांना गर्वाचा व आनंदाचा हा क्षण असल्याने युवक काँग्रेस तर्फे लाडु वाटप भारत माता की जय जयघोष करून खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *