Vaccination Certificate : लसीकरणाचे प्रमाणपत्र आता व्हॉट्सअपवर, असे काढता येईल प्रमाणपत्र

Pckhabar-कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तीन सोप्या बाबी पूर्ण कराव्या लागतील. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
यापूर्वी कोविन संकेतस्थळावर जाऊन लस घेतल्याचे प्रमाणपत्र डाऊनलोड करावे लागत होते. आता हे प्रमाणपत्र काही मिनिटांत तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवू शकता.
अशी आहे प्रक्रिया
सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर +91 9013151515 हा नंबर सेव्ह करावा लागेल ( हा नंबर तुम्ही लस घेताना प्रविष्ट केलेल्या त्याच मोबाईल नंबरवर सेव्ह करावा लागेल.) हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुमचे व्हॉट्सॲप उघडा. चॅट बॉक्स वर जा आणि कोविड प्रमाणपत्र (covid certificate) असे टाइप करा. हे टाइप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी मिळेल.
हा OTP व्हॉट्सॲप चॅट बॉक्समध्येच टाईप करा आणि पाठवा. लक्षात ठेवा की तुम्हाला मिळणारा OTP फक्त 30 सेकंदांसाठी असेल. जर तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांच्या लसीकरणाच्या वेळी समान नंबर दिला असेल तर ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला त्या सर्व सदस्यांचे लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल. हे प्रमाणपत्र तुम्ही डाऊनलोड करून जतन करून ठेऊ शकता.










Leave a Reply