Pimpri News : कोकणातील पूरग्रस्तांना लायन्सचा मदतीचा हात

Pimpri News : कोकणातील पूरग्रस्तांना लायन्सचा मदतीचा हात

Pckhabar- लायन्स क्लब पुणे सेलिब्रेशन च्या वतीने कोकणातील पूरग्रस्त बांधवांसाठी अति तातडीची मदत मंजिरी व कोंदे (चिपळूण येथील) या गावी 200 कुटुंबासाठी किराणा कीट तसेच अंथरुण- पांघरुन, साडी चोळी, शर्ट व सॅनिटरी नॅपकिन  प्रत्यक्ष त्याच्या घरी जाउन त्यांना एक हात मदतीचा दिला. सेलिब्रेशन

क्लबचे अध्यक्षला जितेंद्र ठोंबरे यांनी मदतीसाठी केलेले आव्हान आणि त्याला  मिळालेली भरपूर साथ या जोरावर तीन दिवसात चार लाख मदत गोळा केली. या उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख ला. धनंजय धुमाळ, ला. आप्पासाहेब सूर्यवंशी सेक्रेटरी ला पद्मजा कदम झोन चेअरपर्सन ला. भरत इंगवले यांनी खूप मदत केली. त्याचप्रमाणे क्लब मधील सर्व लायन्स नि भरपूर मदतीचा हात दिला. मदत पोहोचविण्यासाठी एम जे एफ ला. शशि कदम, ला.संदीप पाटील, ला.दत्तात्रेय सपकाळ, ला.प्रविण शिंदे, ला.अब्बास चौधरी, ला.विशाल पाटे ह्यानी खूप परिश्रम घेतले.

ही मदत मिळाल्यामुळे कोकणवासीयांचे चेहर्‍यावर आनंद पाहावयास मिळाला. या मदतीसाठी लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर व लायन्स क्लब ऑफ़  पिंपळे सौदागर अ‍ॅक्टिव्ह यांचे पण सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *