Maharashtra News : श्रावण महिन्यानिमित्त जाणून घ्या ज्योतिर्लिंगे…
Pckhabar- पवित्र श्रावण महिन्याला आजपासून सुरूवात झाली आहे. भारतातील प्रमुख 12 मंदिरांना 12 ज्योतिर्लिंगे म्हणतात. या 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंगे आहेत. श्रावण महिन्यानिमित्त दर सोमवारी तीन ज्योतिर्लिंगांची माहिती pckhabar. Com च्या वाचकांना देण्यात येणार आहे. आज पहिल्या सोमवारी सोमनाथ (गुजराथ – वेरावळ), मल्लिकार्जुन(आंध्रप्रदेश – श्रीशैल्य),
महाकाळेश्वर (मध्यप्रदेश – उज्जैन) या तीन ज्योतिर्लिंगांची माहिती जाणून घेऊया.

1. सोमनाथ (गुजराथ – वेरावळ)
गुजरातमध्ये सौराष्ट्रात वसलेले सोरटी सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देशातील प्राचीन तीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे. याच्या शिखरावरील कलशाचे वजन दहा टन आहे. ध्वजाची उंची 27 फूट आहे. पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एक कथा आहे. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसादिवसाने कमी होत जाईल. असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी. सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें लिंग स्थापून पूजा केली म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले .
2. मल्लिकार्जुन(आंध्रप्रदेश – श्रीशैल्य)

गुंटकल बेसवाडा – या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गावाला मोटारीने जावे लागते. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकरीतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पाच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.
3. महाकाळेश्वर (मध्यप्रदेश – उज्जैन)-

हे मंदिर मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यामध्ये आहे. हे ज्योतिर्लिंग व स्वयंभू असून रुद्रसागर तलावाच्या काठावर उज्जैन शहरात आहे. हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्य राज्याची राजधानी येथे होती. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यातजगभरातून भाविक येथे जमा होतात. श्री महांकालेश्वर ज्योतिर्लिंगची प्रतिमा दक्षिणमुखी आहे. बारा ज्योतिर्लिंगात दक्षिणमुखी पूजेचे महत्वामुळे फक्त महांकालेश्वर येथेच भस्म आरतीहोते. वर्षात केवळ एकदा महाशिवरात्रिच्या दुसऱ्या दिवशी भगवान श्री महांकालेश्वरांची दुपारी बारा वाजता भस्म आरती होते .










Leave a Reply