Pune News : पुणे ते पंढरपूर सायकल “वारी” करणाऱ्यांचा सत्कार

Pune News : पुणे ते पंढरपूर सायकल “वारी” करणाऱ्यांचा सत्कार
Pckhabar- निगडी येथील इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या वतीने पुणे ते पंढरपूर असा सायकल “वारी” यशस्वी केल्याबद्दल आणि १० हजार किमी सायकल प्रवास करणाऱ्या सायकलपट्टूंचा सत्कार आज रावेत येथे करण्यात आला.

यावेळी वसंत ग्रूपचे अध्यक्ष प्रेमचंद मित्तल, संचालक अनिल मित्तल, निर्माण ग्रूपचे अध्यक्ष सुनील रामेश्वर आगारवाल,जैन महासंघाचे अध्यक्ष प्रा अशोककुमार पगारिया, के टाऊन चे संचालक सुभाष तायल,सुनीता बंसल, सुनील मित्तल,इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे संस्थापक चेअरमन गजानन खैरे , गणेश भुजबळ, अजित पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी सीए कृष्णलाल बंसल, अमित पवार,संतोष साळुंके,रमेश खाडे यांनी १० हजार किमी सायकल प्रवास पूर्ण केल्याबद्दल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रेमचंद मित्तल म्हणाले कि, पंढरपूर हे साधू संतांचे माहेरघर आहे. आपण सर्वजण विठ्ठल भक्त आहोत. सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्य सांभाळून धार्मिकता जपली जाते हि कौतुकास्पद बाब आहे.

सुनील अगरवाल म्हणाले कि , कोविड काळात हि सायकलवरुन प्रवास करीत वारीची परंपरा सायकलपट्टुंनी जपली हे वाखाणण्याजोगी बाब आहे. आजच्या पिढीला सायकलचे महत्त्व पटवून देणे काळाची गरज बनली आहे.

सीए बंसल म्हणाले कि, माझ्या पत्नीकडून सायकल भेट मिळाल्यानंतर मला तिने सायकलवरून १० किमीचा प्रवास पूर्ण करण्याचे आव्हान दिले. आणि माझ्या पत्नीचे आव्हान स्वीकारले. हे आव्हान नव्हे तर हा एक निरोगी राहण्याचा विचार आहे. असे समजून एका वर्षभरात हा टप्पा पूर्ण केला.
कार्यक्रमात सुमारे ५०० जण सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन खैरे यांनी केले. सूत्रसंचालन कपिल पाटील तर आभार के एल बंसल यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे अध्यक्ष गजानन खैरे, गणेश भुजबळ,अजित पाटील,गिरिराज उमरीकर,अजित गोरे,रोहित जयसिंघानी,प्रमोद चिंचवडे,श्रीकांत चौधरी,गोविंद घाटकर, परिमल बर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *