Pune News : उद्यापासून पुणे अनलॉक !
Pckhabar- उद्या सोमवारपासून पुणे शहर अनलाॅक करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्बंध कायम असणार आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरामध्ये निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे, मात्र पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात लेव्हल तीनची नियमावली सोमवारपासून लागू केली आहे. ग्रामीणचा रुग्णवाढीचा दर ५.५ आहे. पण तिथे लेव्हल ४ ऐवजी ३ ठेवली आहे. पुणे, पिंपरी चिंववड महानगरात शिथिलता देण्यात येत असली तरी कोरोना वाढणार नाही याची खबरदारी प्रत्येकोने घेतली पाहीजे. पुण्यातील प्रमाण ३.३ आणि पिंपरी चिंचवड ३.५ आणि ग्रामीणचे संसर्गाचे प्रमाण ५.५ आहे. ग्रामीण रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आल्यानंतर तिथे शिथिलता दिली जाईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यासंदर्भात कोणताही निर्णय घेताना सर्वांची मते विचारात घेत निर्णय घेण्यात येतात. आपल्या सर्वांची मते विचारात घेत निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात येत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच १९ ऑक्सीजन प्लॉन्ट सुरू झाले आहेत, ३४ प्लांन्ट प्रस्तावित आहेत, नजीकच्या कालावधीत ऑक्सीजन प्लांट गतीने सुरू होतील, जिल्ह्याला ऑक्सीजनबाबत स्वंयपूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.
हॉटेल आणि रेस्टॉरंटला ५० टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी आहे, प्रत्येक १५ दिवसांनी मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागात हॉटेल फक्त ४ वाजेपर्यंत खुले राहतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे शहरातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळ ते रात्री सुरु
पुण्यातील दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टी नुसार आठवड्यातून एक दिवस बंद
सोमवार पासुन अमंलबजावणी
मॉल हॉटेल जलतरण तलाव यासाठी सुद्धा नवी नियमावली.
*- सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार*
*- हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार*
*- शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी*
*- मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश*










Leave a Reply