Pimpri News : निवासी घरांचे प्रभागनिहाय स्ट्रक्चरल ऑडिट करा: माजी खासदार गजानन बाबर

Pimpri News : निवासी घरांचे प्रभागनिहाय स्ट्रक्चरल ऑडिट करा: माजी खासदार गजानन बाबर
Pckhabar-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील निवासी घरांचे प्रभागनिहाय स्ट्रक्चरल ऑडिट महानगरपालिके मार्फत करण्याची मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

याबाबत बाबर यांनी आयुक्त पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची ओळख उद्योगनगरी म्हणून आहे ,येथे सर्व स्तरातील लोक वास्तव्यास आहेत आज पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास 25 लाखांच्या घरापर्यंत पोहोचली आहे . आज आपण जर पाहिले तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कष्टकरी ,कामगार , मजूर ,टपरीधारक, माथाडी कामगार ,किरकोळ विक्रेते, सर्वसामान्य नागरिक, श्रमिक ,मध्यमवर्गीय ,रिक्षा चालक ,ड्रायव्हर ,भाजीपाला विक्रेते, सुरक्षारक्षक, ‘ड’श्रेणीतील कर्मचारी, वरील सर्व व उर्वरित सामान्य नागरिक ज्यांनी अर्धा,एक ,दीड गुंठा जागा घेऊन उपजीविकेसाठी घरे बांधली आहेत. त्याचप्रमाणे निवासी गृहयोजना सुद्धा वास्तव्यास महानगरपालिका हद्दीमध्ये आहेत.

आज आपण वास्तविकता जर पाहिली तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील तसेच इतरत्र भागातही निवासी घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जात नाही. तसेच वरील सर्व सामान्यांनी घरांचे स्ट्रक्चरल डिझाईन केले असेल असेही नाही. यामुळे नागरिकांच्या जीवाचा प्रश्न उपस्थित होत आहे .मुंबईमध्ये आपण पाहिले असता इमारती कोसळण्याच्या दुर्घटनेमध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नागरिकांनी घर बांधत असताना किंवा एखादी बहुमजली इमारत बांधत असताना आरसीसी स्ट्रक्चरल डिझायनर कडून परवानगी घेतलेली नाही असे बहुतांशी आढळून येत आहे, तसेच स्ट्रक्चरल ऑडिट नसल्यामुळे किंवा एखादी इमारत स्टेबल आहे की नाही हे माहीत नसल्यामुळे वरील दुर्घटना घडून घरातील सर्व कुटुंबियांना खूप मोठ्या आर्थिक, जीवितहानी या दुर्घटनेला सामोरे जावे लागत आहे. निवासी गृह प्रकल्पांने नकाशांना परवानगी घेतली असली तरी त्यांचे दुबार स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही ही बाब ही समोर येत आहे. याकडेही आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. यामुळे दर पाच वर्षाने पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतील प्रभागनिहाय निवासी घरांचे, कमर्शियल इमारतींचे, पिंपरी-चिंचवड हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे अत्यंत गरजेचे आहे.

संभाव्य होणारा अनर्थ टाळण्यासाठी माननीय महोदय आम्ही आपणास पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या वतीने विनंती करतो की पिंपरी-चिंचवड महानगर पालिका हद्दीतील सर्व निवासी घरांचे आपण आपल्या मार्फत प्रभागनिहाय स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे .

तसेच जीवित व आर्थिक हानी व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या कुटुंबीयांवर होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी हे ऑडिट दर पाच वर्षांनी होणे आवश्यक आहे. असे माजी खासदार गजानन बाबर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *