Pimpri News : तरूण-तरूणींनी मिळालेल्या संधीचे सोने करावे : स्थायी समितीचे माजी सभापती संतोष लोंढे
Pckhabar-लायन्स क्लब्स इंटरनॅशनल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व स्टाफ ब्लूम यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचा एक चांगला उपक्रम सुरू आहे. या माध्यमातून तरूण-तरूणींनी मिळालेल्या संधीचे सोने करावे आणि झोकून देऊन काम करावे, असे मार्गदर्शन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती, विद्यमान नगरसेवक संतोष आण्णा लोंढे यांनी केले.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक पिंपरी, येथील लायन्स स्किल सेंटर या ठिकाणी “नोकरी व कौशल्य विकास” मेळावा २ चे ३ ऑगस्ट रोजी ११ ते २ या वेळेत लायन्स क्लब्स इंटरनॅशनल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्टाफ ब्लूम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन स्थायी समितीचे माजी सभापती संतोष आण्णा लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी लोंढे बोलत होते. माजी प्रांतपाल एम जे एफ लायन ओमप्रकाश पेठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या मेळाव्यात ५७ गरजूंचे समुपदेशन करण्यात आले व त्यांचे शिक्षण आणि कौशल्यनुसार कंपनीत मुलाखतीसाठी पाठविण्यात आले.
कारखान्यात आपली वागणूक व कामाच्या पद्धतीबद्दल लायन ओमप्रकाश पेठे व लायन अनिल झोपे यांनी मागदर्शन केले.
श्रीमती श्रुतिका मुंगी यांनी अपेक्षांचे ओझे न बाळगता आपले स्थान निर्माण करा यावर समुपदेशन केले.
लायन अशोक येवले यांनी येत्या महिन्यात सुरू होणाऱ्या संगणक प्रशिक्षणा संदर्भात माहिती सांगितली.
कौशल्य विकास प्रमुख लायन अशोक येवले, संदीप पाटील, जयंत तांबडे, श्रीमती श्रुतिका मुंगी यांनी मेळाव्याचे आयोजन व तो यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका निभावली.
लायन हिरामण गवई, लायन राजेंद्र कोळी, लायन अनिल झोपे यांनी मेळाव्यास भेट देऊन आयोजकांचे मनोधैर्य वाढविले.










Leave a Reply