Talegaon Dabhade News : रस्त्यांची ’जनसेवा विकास समिती’च्या वतीने दुरुस्ती

Talegaon Dabhade News : रस्त्यांची ’जनसेवा विकास समिती’च्या वतीने दुरुस्ती
Pckhabar-तळेगाव स्टेशन परिसरातील खड्डेमय झालेल्या हिंदमाता रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला ‘जनसेवा विकास समिती’ च्या वतीने  आज (शुक्रवार) सुरूवात झाली आहे. या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नगरसेविका सुलोचना आवारे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी  विरोधीपक्ष नेते गणेश काकडे, अनिता पवार, बांधकाम समितीचे सभापती निखिल भगत, नगरसेवक रोहित लांघे, रवींद्र आवारे, अरुण भेगडे, समीर खांडगे, प्रवक्ते मिलिंद अच्युत, कल्पेश भगत, सुनील पवार आदी  नागरिक उपस्थित होते.

पावसामुळे हिंदमाता रस्त्यावर काका हालवाई स्वीट ते स्वप्न नगरी कॉर्नर पर्यंत या मार्गाची अतिशय दुरावस्था झाली होती. त्यामुळे वाहन चालकांना, पादचारी नागरिकांना या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत होते. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे, चिखल झाला होता. रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी नगरपरिषदेकडे वेळोवेळी नागरिकांनी मागणी केली होती. मात्र, नगरपरिषद प्रशासन याकडे कानाडोळा करत होते.

हिंदमाता रस्त्याची दुरूस्ती व डागडुजी करणार असल्याचे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज (शुक्रवार)पासून रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *