Pimpri News : कन्या विद्यालयात रोटरी क्लबच्या वतीने Ideal study Application Instollation program चे आयोजन

Pimpri News : कन्या विद्यालयात रोटरी क्लबच्या वतीने Ideal study Application Instollation program चे आयोजन
Pckhabar-कन्या विद्यालयात रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने Ideal study Application Instollation program चे आयोजन करण्यात आले होते. हा एक कन्या विद्यालयात आगळावेगळा नवीन उपक्रम करण्यात आला.

रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत मंगळवारी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या वतीने इयत्ता 10 वी च्या विद्यार्थीनींसाठी ideal study application instollation कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी संतोष जाधव (अध्यक्ष , रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन), सारंग माताडे (सचिव आणि माजी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन), अतुल कामत (प्रोजेक्ट डायरेक्टर रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन ), संतोष भालेकर (सदस्य रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन) अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी सुरुवातीला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोला रो.संतोष जाधव (अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन) यांचे हस्ते हार घालण्यात आला त्यानंतर कर्मवीर आण्णा आणि वहिनी यांच्या प्रतिमेस हार फुले घालून पूजन केले आणि कार्यक्रमास सुरुवात झाली यामध्ये सुरुवातीला विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी रोटरी क्लबचे सामाजिक कार्य व दातृत्वशील वृत्ती आपल्या प्रस्ताविकातून व्यक्त केली.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संतोष जाधव यांनी रोटरीचे कार्य व त्यामाध्यमातून समाजातील गरजवंतांपर्यन्त पोहचून मदत करता येते असे मनोगत व्यक्त केले. यानंतर सारंग माताडे यांनी विद्यार्थिनींनी कृतीयुक्त शिक्षणावर भर द्यावा असे मनोगत व्यक्त केले.

यानंतर प्रोजेक्ट डायरेक्टर अतुल कामत यांनी मोबाइलवर Ideal study app . कसे डाउनलोड करावे याची माहिती सांगताना हे aap. एस एस सी बोर्डाचे समन्वयक अ.ल. देशमुख व 10 वी चे सर्व माध्यमांचे बोर्ड कमिटीवरील तज्ज्ञ शिक्षक यांचे मार्गदर्शनातून या aap ची निर्मिती केली असून यामध्ये प्रत्येक विषयाच्या पुस्तकाची पी डी एफ , कृतीपत्रिका, प्रत्येक घटकावरील बहुपर्यायी प्रश्न, व्हिडिओ, सरावासाठी भरपूर प्रश्न , स्वाध्याय, पुस्तकाबाहेरील प्रश्न , यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. याविषयी माहिती दिली.

यानंतर संतोष भालेकर यांनी समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी रोटरी क्लब काम करीत असतात. या app. चा विद्यार्थिनींनी अधिकाधिक उपयोग करून एस एस सी बोर्ड परीक्षेत उत्तम गुण संपादन करावे आणि स्वतःचे, पालकांचे ,शाळेचे नाव समाजामध्ये उंचवावे असे मार्गदर्शन केले.

यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवितात एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरं भेटलेली माणसं . आज या कार्यक्रमात दातृत्व गुण अंगी असलेली माणसं आपल्याला लाभलेली असून विद्यार्थिनींनी चांगला अभ्यास करून स्वविकासाबरोबर सामाजिक ऋण देखील फेडावे. विद्यालयातील उपशिक्षिका निकम मनिषा यांनी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या माध्यमातून इयत्ता दहावीतील 240 विद्यार्थिनींसाठी आणि दहावीला अध्यापन करणारे 15 शिक्षक यांच्यासाठी प्रत्येकी 600/- (सहाशे रुपये) किमतीचे एकूण 1,53,000/- ( एक लाख त्रेपण हजार रुपये ) किंमतीचे अभ्यासासाठीचे Ideal study app देणगीतून मिळवून दिले असे मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यालयाच्या उपशिक्षिका मनिषा निकम यांनी केले. हा ideal study application installation विषयीची सर्व माहिती घरी बसून विद्यार्थिनींना मिळावी म्हणून ह्या कार्यक्रमाचे ऑनलाईन live प्रक्षेपण करण्यात आले . तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका अनघा रांगणेकर यांनी केले व विद्यालयाच्या उपशिक्षिका मनीषा निकम यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *