Dehuroad News : पूरग्रस्तांना देहूरोड शिवसेनेचा मदतीचा हात
Pckhabar- अतिवृष्टीमुळे कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पूरग्रस्तांना देहूरोड येथील शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी मदतीचा हात दिला आहे.
शिवसेना पदाधिकार्यांनी लहान मुलांची कपडे, मुलींचे ड्रेस, मुलांना ड्रेस, पुरुषांसाठी ड्रेस, महिलांना साड्या, पाणी बॉटल, बिस्कीट, तांदूळ, आशा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत.
याप्रसंगी युवासेना जिल्हा समन्वयक अनिकेत घुले, शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू, युवासेना मावळ तालुका उपआधिकारी विशाल दांगट पाटील, शिवसेना देहूगाव शहर प्रमुख सुनिल हगवणे, महिला संघटीका सुनंदा आवळे, लक्ष्मी मिनगी, शिवसेना तळेगाव शहर प्रमुख दत्तात्रय भेगडे, उपतालुका प्रमुख बबनराव पाटोळे, विभाग प्रमुख विजय थोरी, शिवसेना देहूरोड शहर सल्लागार विलास हीनुकले, देवा कांबळे, सुरेश मुळे, महेश डेव्हिड, रफीक शेख, सुनील भंडारी, विशाल जाधव, शिवकुमार कटारिया, विक्रम भंडारी, अमर आवळे, युवासेना देहू गणेश मोरे, सॉलोमन भंडारी आदी शिवसैनिक उपस्थित होते.










Leave a Reply