Wakad Crime News : एसबीआय बँकेचे खाते  ब्लॉक केल्याचा मॅसेज पाठवून  साडेबारा लाखांची फसवणूक

Wakad Crime News : एसबीआय बँकेचे खाते  ब्लॉक केल्याचा मॅसेज पाठवून  साडेबारा लाखांची फसवणूक

वाकड पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे 6 लाख रूपये होल्ड करण्यात  यश

बॅकेचा मॅसेज आल्यास आपल्या शाखेशी संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन

Pckhabar- केवायसी अपडेट न केल्यामुळे एसबीआय बँकेचे खाते ब्लॉक केल्याचा मॅसेज पाठवून बँकेचा ऑफीसर बोलत असल्याचे सांगून मायलेकीची साडेबारा लाखांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना वाकड परिसरात नुकतीच उघडकीस आली.
तर वाकड पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे 6 लाख रूपये होल्ड करण्यात आले.

अनुजा चिरायु जोशी (वय-34, रा. कावेरीनगर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8345087114 या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुजा यांची आई अलका चौधरी, वडील अरूण चौधरी या तिघांचे एसबीआय बँकेत जॉईंट खाते आहे. केवायसी अपडेट न केल्यामुळे खाते ब्लॉक केल्याचा मॅसेज फिर्यादी यांच्या मोबाईलवर आला. त्यांनी हा मॅसेज अलका चौधरी यांना पाठविल्यानंतर त्यांनी 8345087114 या नंबरवर संपर्क साधला. आरोपीने आपण मुंबई एसबीआय बँकेच्या कार्यालयातून राहुलकुमार शर्मा बोलत असल्याचे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून बँक खात्याची सर्व गोपनीय माहिती घेतली.

त्यांच्या खात्यावरून फ्लिपकार्ट आणि दुसर्‍या खात्यावर 12 लाख 60 हजार रूपये वळवून घेतले. मात्र, हा प्रकार लक्षात येताच फिर्यादी यांनी त्वरीत पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांनी 6 लाख रूपये होल्ड केले आहेत. वाकड पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, बॅकेचा कोणत्याही प्रकारचा मॅसेज आल्यास आपल्या बॅकेच्या शाखेशी संपर्क साधवा. आणि आपली फसवणूक टाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *