Lonavala News : विंध्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाटणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत
Pckhabar- मावळात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत पाटण हद्दीतील घरकुल परिसरातील अनेक घरांमध्ये राजाणा ओढ्याच्या पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या नागरिकांना युवा सेनेचे उपतालुका अधिकारी विजय तिकोने यांच्या पुढाकारातून विंध्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले.
पाटण येथील विजय तिकोने यांच्या कार्यालयात तसेच घरकुल परिसरात नुकसानग्रस्त नागरिकांना या मदतीचे वाटप करण्यात आले. संकट काळात जीवनावश्यक साहित्याची मदत मिळाल्याने नुकसाग्रस्त नागरिक भारावून गेले.
यावेळी विंध्या ट्रस्टचे संचालक डॉ.अनिल जयस्वार, डॉ. मायादीन जयस्वार, सुनील जयस्वार, शितल जयस्वार, डॉ. सुप्रिया जयस्वार, स्वाती दारवटकर, सुरग घाग, स्वर्ण कुर्हाडे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.










Leave a Reply