Tokyo Olympics : चक दे इंडिया! 41 वर्षांनी भारताला हॉकीमध्ये मेडल

Tokyo Olympics : चक दे इंडिया!
41 वर्षांनी भारताला हॉकीमध्ये मेडल

Pckhabar-भारतीय हॉकी टीमने ऑलिम्पिक मेडलची 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली असून टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये भारताने जर्मनीचा 5 -4 ने पराभव केला. भारताने 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. त्यानंतर तब्बल 41 वर्षांनी भारतानं ऑलिम्पिकमध्ये हॉकीत मेडल मिळवले आहे.

या मॅचमध्ये जर्मनीने आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्याच मिनिटाला जर्मनीच्या ऊरजनं फिल्ड गोल करत 1-0 नं आघाडी मिळवली. भारताला 5 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र रुपिंदर पाल सिंह गोल करण्यात अपयशी ठरला. दोन्ही टीम सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत होत्या. सातव्या मिनिटाला जर्मनीचा गोल करण्याचा प्रयत्न गोलकिपर श्रीजेशनं उधळला.

पहिल्या क्वार्टरनंतर जर्मनीकडं 1-0 अशी आघाडी होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 5 गोल जर्मनीच्या टीमनं 2008 आणि 2012 ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. तर 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. भारतीय टीमला 41 वर्षांपासून ऑलिम्पिक मेडलची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, भारतीय हॉकी टीमच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभर कौतुक केले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *