Pimpri News : आता बास, निर्बंध शिथील करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांचा महापालिकेवर मोर्चा
Pckhabar-पिंपरी चिंचवड शहरात दुकाने उघडी ठेवण्यावर लावण्यात आलेले निर्बंध शिथील करावेत, यासाठी पिंपरी कॅम्पमधील व्यापाऱ्यांनी शगुन चौकापासून महापालिका मुख्यालयापर्यंत आज (बुधवार) मोर्चा काढला.
व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन तात्काळ निर्बंध शिथील न केल्यास व्यापारी रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास सुरुवात करतील असा इशारा दिला.
पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंडळाने महापौर व आयुक्तांबरोबर चर्चा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासाठी अनुकूलता दर्शविल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणले. त्याबाबत शासनाने काढलेला शासननिर्णय त्यांच्यासमोर ठेवला. यानंतर महापौर ढोरे यांनी व्यापाऱ्यांची बाजू घेत याबाबत त्वरित कार्यवाही करा असे आदेश आयुक्तांना दिले.
मोर्चामध्ये पिंपरी कॅम्पमधील व्यापारी हरेश बोधानी, रोमी संधू यांच्यासह व्यापारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.










Leave a Reply