उपमुख्यमंत्री अजित पवार आज शहरात

उपमुख्यमंत्री अजित पवार आज शहरात
Pckhabar-  पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नेहरूनगर व बालनगरीमध्ये उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरच्या कामाची पाहणी करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी 11.30 वाजता शहरात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  ऑगस्ट अखेरपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 50 हजार होईल असा प्रशासनाचा कयास आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. वाढत्या रूग्णांच्या सोयीसाठी पिंपरी येथील नेहरूनगर मध्ये नव्याने एक हजार बेडचे कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू आहे. तर, भोसरीतील बालनगरी येथे 425 खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *