Talegaon Dabhade News: इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रशिक्षण शाखांचा निकाल शंभर टक्के

Talegaon Dabhade News: इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रशिक्षण शाखांचा निकाल शंभर टक्के
Pckhabar-इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रशिक्षण विभाग या सर्व शाखांचे निकाल शंभर टक्के लागले असून, यावर्षी देखील प्रथम क्रमांकामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. शास्त्र शाखेतून जानवी श्रीपाद भिडे या विद्यार्थिनीने 99 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला असून, मावळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वाणिज्य शाखेतून साक्षी अंकुश गराडे या विद्यार्थिनीने 94.30 टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक पटकाविला. कला शाखेतून नीताकुमारी श्रीपाद भिल्ल या विद्यार्थिनीने 86 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला; तर तंत्रशिक्षण विभागातून लक्ष्मी ईश्वर नारायणकर या विद्यार्थिनीने 75.33  टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. मावळ तालुक्यातून सलग तिसऱ्या वर्षीही इंद्रायणी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे.

महाविद्यालयाचे इतर निकाल पुढीलप्रमाणे :

        विज्ञान शाखा द्वितीय क्रमांक-  तन्वी उत्तम खाडप 96.16%, अलिया मुजिब शेख 96.16%, तृतीय क्रमांक- आनंद प्रशांत शिंदे 95.66%.

        वाणिज्य शाखा – द्वितीय क्रमांक- अपेक्षा सुभाष मराठे 90.66%, तृतीय क्रमांक- सृष्टी संजय पचपिंड 89.00% .

        कला शाखा द्वितीय क्रमांक – अदिती शाम दगडे 83.33%, तृतीय क्रमांक- सानिका शामराव भोसले 83.00%.

तंत्रशिक्षण विभाग द्वितीय क्रमांक- सौरभ धनंजय काटकर 73.50%, तृतीय क्रमांक – पंकज सिद्धेश्वर सुर्यवंशी 73.16%.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे, अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष गोरखनाथ काळोखे, दीपक शहा, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, संचालक विलास काळोखे, गणेश खांडगे, संदीप काकडे, निरुपा कानिटकर, गणेश भेगडे, परेश तारेख, युवा उद्योजक विक्रम काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, उपप्राचार्य अशोक जाधव, विज्ञान शाखेचे प्रमुख प्रा. यु.एस.खाडप, वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. एस.पी.भोसले, कला शाखेचे प्रमुख प्रा.के.डी. जाधव, तंत्रशिक्षण विभागप्रमुख प्रा.एन.टी. भोसले, तसेच सर्व शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *