Wakad Crime News : धक्कादायक, भिशीचे दोन कोटी रूपये घेऊन कुटुंब फरार

Wakad Crime News : धक्कादायक, भिशीचे दोन कोटी रूपये घेऊन कुटुंब फरार
65 जणांना गंडविले
Pckhabar- उचल भिशी लावण्याच्या बहाण्याने 65 नागरिकांचा विश्वास संपादन करून रोख आणि डिजिटल माध्यमातून पैसे स्विकारून तब्बल 2 कोटी चार लाख रूपये घेऊन कुटुंब फरार झाले आहे. ही घटना 2019 ते 28 जून 2021 या कालावधीत रहाटणी येथे घडली.

परशुराम सातपुते (वय-50), सागर परशुराम सातपुते (वय-38),  पुष्पा सातपुते (वय-45, सर्व रा. आईसाहेब निवास, सज्जनगड कॉलनी, रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश बाबुराव घाटे (वय-37, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या 20 ते 25 वर्षांपासून भिशी घेतात. त्यातून त्यांनी परिसरातील अनेक नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. फिर्यादी घाटे यांच्यासह 64 नागरिकांचा आरोपींनी विश्वास संपादन करून भिशी लावण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून रोख आणि डिजीटल माध्यमातून पैसे स्विकारले. आरोपींनी तब्बल 2 कोटी 4 लाख 24 हजार 110 रूपये घेऊन फरार झाले आहेत. आरोपींनी याव्यतिरिक्त आणखी काही नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *