Maharashtra News : We Maratha संघटनेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात!
सामाजिक बांधिलकी जोपासत अत्यावश्यक वस्तूंची मदत
Pckhabar-सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांना महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य लोकांचे संसार उन्मळून पडले आहेत. अशा पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत We Maratha संघटनेने पुढाकार घेतला आहे. तत्परतेने मदत गोळा करून गुरुवारी (ता.5 ऑगस्ट रोजी) महाडच्या दिशेने मदतीचा टेम्पो पाठविण्यात येणार आहे.
We Maratha ही संघटना महाराष्ट्रभर काम करते, “आम्ही समाजाचे काही तरी देणं लागतो”या भावनेने निस्वार्थपणे समाजाच्या हितासाठी एकवटलेल्या ध्येयवेड्या मराठा तरुणांचा हा समुह आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या काळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून या टीमने मोलाची कामगिरी पार पाडली आहे.
सांगली, कोल्हापूर आणि कोकणातील आदी जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. We Maratha या संघटनेने पूरग्रस्तांना मदत म्हणून सर्व टीम ने whatsapp व फेसबुक या सोशल मीडियावर मदतीसाठी आवाहन केले होते. यात संभाजीनगर, अहमदनगर व पुण्याहून भरपूर मोठ्या प्रमाणात मदत जमा करण्यात आली. आलेली मदत किट स्वरुपात बनवून तिचे वाटप येत्या शुक्रवारी म्हणजेच 6 तारखेला We Maratha टीम तर्फे गरजूंना करण्यात येणार आहे.
ही मदत जमा करण्यासाठी We Maratha संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिरुद्ध शिवाजी शेलार, अध्यक्षा सौ. स्नेहलताई कदम पाटील, राज्यप्रमुख श्री. मयूर पाचोरे, सोशल मीडिया प्रमुख श्री. सुधीर सोनवणे, श्री.संदीप निर्मल,श्री. धनंजय निंबाळकर, श्री.माऊली इंगळे, संघटनेचे मराठवाडा विभाग प्रमुख श्री. अंगद भिंगारे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री. ऋषिकेश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष श्री. समाधान नवले, श्री. मयूर श्रिखंडे, श्री.नितिन तवार, श्री. शिवम भुसारे, श्री. दादासाहेब आव्हाळे, श्री. ऋषिकेश राऊत आदींनी परिश्रम घेतले.












Leave a Reply