Pimpri News : आमदार लांडगे यांचे मित्र मिसाळ म्हणतायत महेशदादांचा भाजपमध्ये होतोय जाच!
महेश लांडगे म्हणतायत
राजकीय जीवनाची निवृत्ती भाजपमध्येच
Pckhabar-आमचे मित्र भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांना भाजपमध्ये काम करताना जाच होत आहे. ते आम्हाला दिसत असून मित्राला परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा सल्ला आम्ही दिला असल्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी सांगितले. तर आमदार महेश लांडगे यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करून माझ्या राजकीय जीवनाची निवृत्ती भाजपमध्येच होईल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली माझी राजकीय वाटचाल यापुढे भाजपासोबत कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, भाजपचे राजेश पिल्ले, माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांची नगरसेवक असल्यापासून मैत्री आहे. मैत्री दिनानिमित्त सर्वांनी एकत्र येत टी-पार्टी केली. तसेच सर्व मित्रांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मैत्रीची चर्चा रंगली होती.
पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले ” ‘कमळ’ सोडून परत राष्ट्रवादीत ये’ असे सांगण्यासाठी काल आम्ही मित्राला भेटलो. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांना उमेदवारी देण्याची मागणी आम्ही अजितदादांकडे केली होती. पण, आमच्या छोट्या कार्यकर्त्यांचे त्यावेळी ऐकले नाही. दादांना फीड बॅक चुकीचा दिला. महेश लांडगे यांना तिकीट दिले असते, तर आज राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेतील सत्ता गेली नसते”.
शहराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांना भाजपमध्ये जाच होत आहे. ते दिसत आहे. आमचा मित्र आहे. एकाच पक्षातून सुरुवात केली. पूर्वीची मैत्री आहे. पक्ष बदलले तरी आम्ही मैत्री विसरलो नाहीत. मिसाळ यांनी केलेल्या या दाव्यांची आज अनेक माध्यमांत बातमी छापून आली. यानंतर भाजपचे आमदार, शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे.
लांडगे आपल्या पोस्टमध्ये म्हणातात”
आम्ही २०१६ मध्येच भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही २०१९ मध्ये भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि जिंकलीही. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपामध्ये काम करण्याचा अनुभव अतुलनीय आहे. मी भाजपामध्ये आनंदी आहे. एव्हढेच नाही, तर मी भाजपामध्येच राजकीय निवृत्ती घेणार आहे. त्यानंतर समाजसेवेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत अखेरपर्यंत कार्यरत राहणार असल्याचा खुलासा लांडगे यांनी केला आहे”.










Leave a Reply