Pimpri News : 9 ऑगस्टपासून पोलीस ठाण्यात दर आठवड्यात जनता दरबार होणार
परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे नागरिकांच्या प्रश्नांचे करणार निराकारण
Pckhabar-नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिलेल्या सुचनेनप्रमाणे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 9 ऑगस्टपासून परिमंडळ दोनच्या हद्दीतील सात पोलीस ठाण्यामध्ये दर आठवड्यामध्ये जनता दरबार घेण्यात येणार आहे.
परिमंडळ दोनच्या हद्दीतील वाकड, हिंजवडी, सांगवी, चिखली, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे आणि त्याअंतर्गत येणार्या रावेत, शिऱगाव पोलीस चौकी परिसरातील नागरिकांसाठी हा जनता दरबार होणार आहे. नागरिकांच्या समस्यांचे निराकारण पोलीस उपायुक्त आनंद भोईटे हे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत करणार आहेत.
सोमवार- सांगवी पोलीस ठाणे,
मंगळवार -तळेगाव दाभाडे, तळेगाव दाभाडे एमआयडीसी, शिरगाव पोलीस चौकी यांचा दरबार तळेगाव पोलीस ठाण्यात होईल.
बुधवार- देहूरोड पोलीस ठाणे, रावेत पोलीस चौकी यांचा दरबार देहूरोड पोलीस ठाणे,
गुरूवार- चिखली पोलीस ठाणे,
शुक्रवार- हिंजवडी पोलीस ठाणे,
शनिवार-वाकड पोलीस ठाणे
या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी आपल्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी या जनता दरबाराला उपस्थित रहावे, असे आवाहन परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे.










Leave a Reply