Pimpri News : हॉटेल व्यावसायिक, किरकोळ विक्रेत्यांना वेळ वाढवून द्या: माजी खासदार गजानन बाबर
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराची ओळख उद्योगनगरी म्हणून आहे. शहरात सर्वच स्तरातील लोक वास्तव्यास आहेत. कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, किरकोळ विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सर्वच व्यवसायिक मेटाकुटीला आले असून हॉटेल व्यावसायिक, किरकोळ विक्रेत्यांना व्यावसाय करण्यासाठी वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.
याबाबत बाबर यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, किरकोळ विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 70 टक्के व्यवसायिकांची रोजीरोटी दररोज होणार्या व्यवसायावर अवलंबून असते. सकाळ पासून जर काम केले तर संध्याकाळी त्यांना जेवायला मिळते. व्यापारामुळे नागरिकांचीही गैरसोय होत आहे. लॉकडाऊनमुळे व्यापार्यांचे मोठे नुकसान होत आहे. दुकानाचे भाडे, कामगारांचा पगार आदी खर्च भागविणे मोठे जिकरीचे होत आहे.
शासनाच्या ’ब्रेक द चैन’ या नियामामुळे, व्यापार्यांना व्यवसाय करण्याच्या वेळेमध्ये मोठी बंधने येत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची रूग्ण संख्या कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत व्यापार्यांना वेळेमध्ये सवलत मिळण्याची नितांत आवश्यकता आहे. सर्वच व्यापारी, दुकानदारांना सकाळी 11 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मुभा देण्यात यावी, अशी मागणी शहरातील तमाम व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, किरकोळ विक्रेते ,घाऊक विक्रेते यांच्या तर्फे यांच्या संघटनेतर्फे माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.










Leave a Reply